आज सकाळी ६ वा , जाग आली . रविवार आहे , बाहेर प्रसन्न वातावरण होत . बिछान्यात न रेंगाळता उठून सायकल रपेट करण्याची ईच्छा झाली . तयार होऊन सायकल काढली .गेट बाहेर पडल्यावर कुठे जावं म्हणून विचार आला . आणि खयाल आया , why not revisit your childhood today !!
सायकल लकडी पुलावरून नारायण पेठेत वळवली. रमत गमत नारायणपेठ रमणबाग शाळे वरून पुढे , रविवार , रास्ता पेठ करत तिथल्या गल्लयांतून फिरता फिरता लहान पणात जाऊन पोहोचलो. मग सोमवार पेठेतल्या शाहू तलावा जवळ आलो. मन म्हणाले " जा आत जाऊन बघ ". मग काय सायकल लावली बाहेर आणि पोहोचलो आत.
आत शिरल्या शिरल्या प्रचंड विचारांशी गप्पा मारायला लागलो. त्या कोपऱ्यात ( अडिच फूट पाणी) मी पहिल्यांदा पाण्यात उतरलो होतो. ( साल असेल ६८/६९) , पाण्याची भीती अनुभवत हळू हळू ५ फुटात , नंतर ६ फुटात आणि मग चक्क काही दिवसात १० फुटात पोहोचून , प्लॅंक वरून उडी मारण्या पर्यंत मजल गेली होती. भयावर मात करणे इथेच शिकलो होतो.
लहान होण्याची जणू जादूची कांडी मिळाल्याचा आनंद अनुभवला. पुढील १० मिनिटे just , तिथली लहान मुले न्याहाळण्यात घालवली.
चक्क समाधी म्हणजे काय असते ते अनुभवले .
थोड्या वेळाने बाहेर पडलो आणि ज़िल्हा परिषद बिल्डिंग कडे निघालो. लहान पणी ही बिल्डिंग खूप मोठी वाटायची , आज माझ्यासारखीच लहान झालेली दिसली. त्या काळी आम्ही मित्र पैसे असतील तेव्हा , तेथील basement च्या दुकानात नीरा प्यायचो. दुकान उघडे होते . १५ पैश्याची नीरा , पंधरा रुपयाची झाली . का नाही होणार मी नाही का , २० किलोचा ८० किलो झालोय . निरेचा स्वाद पुन्हा एकदा त्या काळात घेऊन गेला .असे म्हणतात लहान पणचे चवी , आवाज , गंध खूप खोल store झालेले असतात. त्याचा प्रत्यय येत घोट घेत होतो.
पुढे सायकल camp कडे वळवली . माझे बाबा त्या काळी जिथे ऑफिस ला जायचे त्या ठिकाणी गेलो तर मोडकळीला आलेली बिल्डिंग दिसली. तरी आत जावंसं वाटलं . आत बघतो तर ४-५ कुत्री भो भो करत अंगावर आली. तिथेच परिसर न्याहाळत पायरी वर बसलो. कुत्री भुंकायची चक्क थांबली . बहुतेक त्यांना माझ्या मनाची तृप्तता जाणवली असणार. असाच बसून राहावंसं वाटत होत , पण आता बरीच काही ठिकाण साद घालायला लागली होती.
निघून लाल देवळाकडे ( it is a jew church ) मोर्चा वळवला .ज्या कट्ट्यावर आम्ही बसायचो तो नाहीसा झाला होता , आता लोखंडी रेलिंग लागले होते. पुढे MG रोड वरून जाताना , तरुण पणी कॅम्पात फिरायची फँटसी आठवली. नाझ कॅफे च्या जागी आता McD किंवा तत्सम कॅफे आलं आहे. अजून कॅम्प मध्ये बरीच इराणी हॉटेल्स आहेत . एका हॉटेल मध्ये बरीच लोक बन मस्का , चहा , ऑम्लेट ची मजा घेत होती . म्हटलं नीरे वर आता असले काही नको , आता पुढे चला . फिरत फिरत पुढे शंकरशेट रोड , गोळी बार मैदान , स्वारगेट , सारस बाग करत लोकमान्यनगर ला नकळत कधी पोहोचलो आणि परत सत्य स्थितीतल्या वयात पोहोचायला लागलो.
येताना एक सकाळी वाचलेली बातमी मनाला खात होती.
Anthony Bourdain- a
celebrity travel film personality,
commited suicide. Man who always said he has the best job in the world.
Who had been travelling places and covering innumerable cuisines of the world ,
who sat with likes of Barack Obama over a glass of beer, had a 11 year old
daughter , was quite handsome and impressive personality at his age of 61. why
should he do this?
Is having everything
you want a curse ? why don't these guys go and help out needy people of the
world , if they are bored with everything they have had. Isn’t world is too big for anyone, to have
experienced every wonder that it offers.
Perhaps he wasn't
lucky enough to have an opportunity to go back to his childhood and become one
again.
I wish he had !!